घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या अडचणी तातडीने दूर करा
गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती श्रीमती रूतिका मसराम यांचे निर्देश
Date : 16 Aug 2026
बैठकीत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना २.० आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजनेच्या संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच योजनेच्या माध्यमातून झालेल्या कार्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी चर्चा करण्यात आली. बैठकीत सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, समिती सदस्य श्री. नागेश मानकर, श्री. विवेक निकोसे, श्रीमती योगिता तेलंग, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या तीन टप्प्यातील अनुदानासंदर्भात अडचणीं संबंधित चर्चा करण्यात आली. निवडक लाभार्थ्यांना आलेल्या अडचणींना तातडीने दूर करण्यात यावे आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना सहयोग करावा असे निर्देश सभापती श्रीमती मसराम यांनी दिले.