सक्करदरा तलाव सौंदर्यीकरणासह परिसराच्या सर्वांगीण विकासावर भर द्या:
महापौर निता ठाकरे यांनी केली परिसराची पाहणी
Date : 18 Aug 2026
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजना व प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेता श्री. संजय महाकाळकर, नगरसेवक श्री. रितेश पांडे, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान सक्करदरा व नेहरू नगर झोन परिसरातील स्वच्छतेचाही आढावा घेण्यात आला. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी नेहरूनगर झोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उद्यान विभागाला परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य देत नियमित व विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. परिसरातील उद्याने, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता प्रभावीपणे राखण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच सक्करदरा तलाव परिसरातील विद्युत व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह परिसराचे आकर्षक व नियोजनबद्ध सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तलाव परिसराचा विकास करताना नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवणे आणि पर्यटन व मनोरंजनाच्या दृष्टीने त्याचा विकास करण्याबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.