शहरातील 200 अवैध बांधकामांना मनपाची नोटीस अवैध बांधकाम व अतिक्रमणाच्या विरोधात मनपाची धडक कारवाई
महापौर निता ठाकरे यांच्या नेतृत्वात कारवाईचा आढावा
Date : 18 Aug 2026
सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, अग्निशमन व आपात्कालिन सेवा समितीच्या सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. अशोक गराटे, उपायुक्त श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता श्री. विजय गुरूबक्षानी, नगररचना विभागाचे सहायक संचालक श्री. ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता श्री. अनिल गेडाम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
अवैध बांधकाम करणार्यांवर वचक पाहिजे - महापौर
शहराचे रुप पालटण्यासाठी बेकायदेशीर बांधकाम तसचे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची आवश्यकता असल्याचे महापौर श्रीमती ठाकरे यांनी सांगितले. केवळ थातूरमातूर कारवाई करून चालणार नाही तर शहरात बेकायदेशीर बांधकाम करणार्यांवर वचक बसला पाहिजे, अशी कारवाई लोकांना दिसली पाहिजे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास तसे प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांनी द्यावे, अशी सूचना त्यांनी दिल्या. झोन कार्यालयांनी नगररचना विभाग, पोलीस, अग्निशमन दल, अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचार्यांना सोबत घेऊन संयुक्तपणे कारवाई केल्यास अधिक परिणामकारक होईल. अतिक्रमण विभागात मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
नागरी पोलीस भरती विचाराधीन
शहरातील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असून यासाठी मनपाने नागरी पोलीसांची (सिव्हील पोलीस) भरती तसेच प्रतिनियुक्तीवर तहसीलदारांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करावा. यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी सूचना महापौर श्रीमती ठाकरे यांनी यावेळी केली. अनेक ठिकाणी नारळ पाणी विकणारे रस्त्यावर दिसतात. तुकडोजी पुतळा परिसरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.
अवैधपणे गोदाम बांधकाम करणार्यांनी सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. बांधकामाचे कोणतेही नियम न पाळता हे बांधकाम झाले आहे. अनेक ठिकाणी मोठे खांब उभे केल्याने नुकसान होत आहे. या बांधकामांना नव्या डीपीआरमध्ये व्यावसायिक क्षेत्र म्हणून मंजुरी देऊ नये, अशी सूचना महापौर यांनी प्रशासनाला केली.
त्याचप्रमाणे अवैध बांधकाम तसेच अतिक्रमण हटावची कारवाई करताना सर्व विभागांनी समन्वयाने कारवाई करावी. या कारवाईचे छायाचित्रे काढावे, अशी सूचना त्यांनी केली. अनेक विभाग विकास कामे करण्यासाठी 100 मीटर सिमेंटचे रस्ते फोडण्यासाठी परवानगी घेतात परंतु प्रत्यक्षात हजार मीटर रस्ता फोडतात, असे निदर्शनास आल्याचे श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सांगितले.
मनपाच्या 10 झोन कार्यालयामार्फत बेकायदेशीर बांधकामांना कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसची झोननिहाय यादी पुढीलप्रमाणे.