रंगला स्त्रीशक्तीचा उत्सव, आनंदाचा जल्लोष
‘महापौर श्रावण उत्सव सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
Date : 19 Aug 2026
कार्यक्रमात माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, माजी महापौर श्रीमती वसुंधरा मसुरकर, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड,धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, मंगळवारी झोन सभापती श्रीमती सीमा डवरे, गलिच्छ वस्ती सभापती श्रीमती रुतीका मसराम, नगरसेविका साधना बरडे, श्रीमती माधुरी टेकाम, श्रीमती योगिता तेलंग, श्रीमती ममता ठाकूर, श्रीमती पूजा पाठक, श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती सरस्वती सलामे, श्रीमती स्नेहल ठाकरे, श्रीमती सुनीता तभाने, माजी नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, माजी नगरसेविका श्रीमती विनया फडणवीस, श्रीमती प्रगती पाटील, क्रीडा विभागाच्या श्रीमती उज्ज्वला चरडे, कार्यकारी अभियंता श्रीमती सविता गणोरकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना श्री. तिवारी यांनी सांगितले की, महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळावी आणि महिलांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा, हाच या कार्यक्रमा मागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही आपल्या संकल्पनेतून महिलांसाठी अशा स्वरूपाचे विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्याच परंपरेत हा श्रावण उत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर घर, कुटुंब, मुलं आणि कामाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलांना काही काळ स्वतःसाठी देता यावा, मनमोकळेपणाने आनंद लुटता यावा आणि मैत्रिणींसोबत उत्सव साजरा करता यावा, यासाठी हा विशेष उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजेत्यांची नावे
यावेळी महिलांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद लुटला. यावेळी श्रावण गीते, फॅशन शो, डान्स , गाणे , मजेशीर खेळ घेण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारा सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमात श्रावण क्वीन, फुल राणी, तुझी माझी जोडी आणि ‘रंग माझा हिरवा’अशा विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी सर्व विजेत्या महिलांना "पैठणी साडी व डिनर सेट" देऊन गौरविण्यात आले. श्रीमती राजश्री बिस्वास, श्रीमती सोनिया बरकी, श्रीमती नेहा त्रिवेदी, श्रीमती महिमा चौधरी या विविध खेळाच्या विजेत्या ठरल्या.
रंग माझा हिरवा स्पर्धेत श्रीमती पूजा दायमा, श्रावण क्वीन श्रीमती भावना, नृत्य स्पर्धेत श्रीमती संजीवनी, श्रीमती श्वेता तिवारी, श्रीमती ज्योती सहारे, श्रीमती भाविका नेवारे यांनी बाजी मारली.