पर्यटन स्थळ म्हणून अंबाझरी तलाव विकसित करणार
मुख्यमंत्र्यांनी केली अंबाझरी तलाव परिसराची पाहणी अंबाझरी तलावात मुख्यमंत्र्यांचा नौकाविहार
Date : 20 Aug 2026
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी तलाव जलपर्णी विळख्यातून मुक्त करण्याच्या मनपाच्या मोहिमेची माहिती जाणून घेतली. या पाहणीच्यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती लक्ष्मी यादव, हनुमानगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, परिवहन समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे, गांधीबागच्या झोन सभापती श्रीमती उमा देशमुख, क्रीडा विशेष समितीच्या सभापती सौ. दर्शनी धवड, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, विधी विशेष समितीच्या सभापती कु. निधी तेलगोटे, शिक्षण विशेष समितीच्या सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती श्रीमती रुतिका मसराम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती सारिका नांदूरकर, कर आकारणी समितीच्या सभापती श्रीमती सरिता कावरे, अग्निशमन व आपात्कालिन सेवा समितीच्या सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक श्री. योगेश पाचपोर नगरसेवक श्री. विजय होले, नगरसेविका श्रीमती वर्षा चौधरी, नगरसेविका श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेविका श्रीमती विशाखा मोहोड, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, नगरसेवक श्री. विनय दाणी, नगरसेविका श्रीमती प्रमिला मथरानी, नगरसेवक श्री. संदीप गवई, नगरसेविका श्री. दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, नगरसेविका श्रीमती पूजा भूगावकर, नगरसेवक श्री. संजय बालपांडे, नगरसेवक श्री. विक्रम ग्वालवंशी, नगरसेविका श्रीमती योगिता तेलंग, नगरसेविका श्रीमती माधुरी फुलसुंगे, नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे, नगरसेवक श्री. सुनील दांडेकर, नगरसेविका माया हाडे, नगरसेवक श्री. ईश्वर ढेंगळे, नगरसेवक श्री. संजय उगले, नगरसेविका श्रीमती माहेश्वरी पटले यांच्यासह इतर प्रभागाचे नगरसेवक अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मनपा अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
मनपाचे कार्य प्रशंसनीय – मुख्यमंत्री फडणवीस
अंबाझरी तलावाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंबाझरी तलाव हा नागपूरच्या सांस्कृतिक वारश्याचा एक भाग आहे. नागपूरला पाणी पुरवठ्याचा एक स्त्रोत म्हणून अंबाझरी तलाव होता. या तलावातून इंग्रजांच्या काळात नागपूरला पाण्याचा पुरवठा होत होता. एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून अंबाझरीचा नेहमी उल्लेख केला जात होता. परंतु गेल्या काही काळापासून या तलावाला जलपर्णीचा विळखा बसला होता. यामुळे या अंबाझरी तलाव नष्ट होतो की, अशी भीती निर्माण झाली होती. परंतु नागपूर महानगरपालिकेने अत्यंत चांगली मोहिम राबवून अंबाझरी तलाव जलपर्णी मुक्त केला आहे. हा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. भविष्यात अंबाझरी तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
एमआयडीसीतून येणार्या दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्यासाठी वाडी नगर पंचायतचा एक सिवरेज प्रक्रिया केंद्र (एसटीपी) लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी अंबाझरी तलावात येईल. यामुळे यापुढे जलपर्णी या तलावात दिसणार नाही. या तलावात कायकिंग सह इतर जलक्रीडाचे प्रकार सुरू व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अंबाझरी तलावाची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सर्वांच्या प्रयत्नांना यश: महापौर
अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले आहे. स्थानिक नगरसेवक, मनपा प्रशासन यांनी नियमितपणे जलपर्णी काढण्यासाठी प्रत्यन केले. यामुळे तलावाचे वैभव आज परत येत असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले.
विशेष मोहिमेला यश
गेल्या काही महिन्यांपासून मनपातर्फे अंबाझरी या ऐतिहासिक तलावातील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या जलपर्णीने संपूर्ण अंबाझरी तलावात जाळे पसरले होते. यामुळे या तलावात पोहण्यासाठी येणार्या जलतरणपटूंची अडचण होत होती. या ऐतिहिसिक तलावाची जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या नेतृत्वात ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर व आयुक्त डॉ. विपीन यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी जेसीबी तसेच वीड हार्वेस्टरचा उपयोग करून जलपर्णीचे निर्मूलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायकिंग स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मनपाचा मानाचा दुपट्टा देवून त्यांचा सत्कार केला.