महापौरांच्या गीत गायनाने श्रावण उत्सवाला वेगळीच ऊर्जा
महापौर श्रावण उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Date : 21 Aug 2026
कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती निता ठाकरे, हनुमान नगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, नेहरू नगर झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, हनुमान नगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, नगरसेविका श्रीमती मंगला मस्के, माजी नगरसेविका श्रीमती स्नेहल बिहारे, श्रीमती मनीषा नगरधनकर, श्रीमती रजनी वानखेडे, माजी नगरसेविका श्रीमती विशाखा जोशी, माजी नगरसेविका श्रीमती वंदना भगत, माजी नगरसेविका श्रीमती स्वाती आखतकार, श्रीमती प्रगती पाटील, श्रीमती सविता मते, क्रीडा विभागाच्या श्रीमती उज्ज्वला चरडे, कार्यकारी अभियंता श्रीमती सविता गणोरकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना महापौर यांनी सांगितले की, आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या शहरातील सर्व मैत्रिणींसाठी(महिलांसाठी) महानगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविका आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नाव लिहितांना जरी महापौर असा उल्लेख असा तरी परिश्रम सर्व महिला नगरसेविकांचे आहे. यावेळी बोलतांना रोजच्या धगधगीतून वेळ काढून आपण सर्व जणी कार्यक्रमाला तयार होऊन नटून-सजून आल्या म्हणून सर्व उपस्थित महिलांचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी महापौरांनी गीत गायले. ज्यामुळे कार्यक्रमाला वेगळाच आपलेपणा आणि ऊर्जा प्राप्त झाली.
यावेळी महिलांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद लुटला. यावेळी टास्क, शृंगार, डान्स , गाणे , मजेशीर खेळ घेण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारा सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी सर्व विजेत्या महिलांना "पैठणी साडी व डिनर सेट" देऊन गौरविण्यात आले. श्रीमती संजना नवघरे, श्रीमती प्रीती, श्रीमती संध्या, श्रीमती मंजुषा सदावर्ते या विविध खेळाच्या विजेत्या ठरल्या.