सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 257 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Date : 24 Aug 2026
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 133 प्रकरणांची नोंद करून 53,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 11 प्रकरणाची नोंद करून रू.1,100 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 28 प्रकरणाची नोंद करून 11,200 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणाची नोंद करून 20,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ , मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे. या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 13 प्रकरणाची नोंद करून रू.65,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 46 प्रकरणांची नोंद करून 9,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 9 प्रकरणाची नोंद करून रू.45,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य साठवल्यामुळे 5 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 चे दंड वसुल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 19 प्रकरणाची नोंद करून 95,000 चे दंड वसुल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी उरलेले अन्न टाकल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकिय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज्/ साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 37 प्रकरणांची नोंद करून रू.2,15,000 दंड वसुल केला.