अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात मनपाची नोटीस कार्यवाही
महापौरांच्या निर्देशांची अंमलबजावणी करीत मे. आकाश इंस्टिट्यूटला नोटीस
Date : 24 Aug 2026
महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणांची व अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खासगी शिक्षण संस्था, वाईन शॉप, रेस्टोरेंट या आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमाननगर झोन: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमाननगर झोन अंतर्गत परिसरांतील अवैध बांधकाम व अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. त्यानुसार येथील अतिक्रमण करणाऱ्या चार आस्थापनांना संबंधित कार्यवाही करून नोटीस देण्यात आले आहे. यात मे. नैवेद्यं प्युर व्हेज फॅमिली रेस्टोरेंट, मे. शान किचन अँड बार, श्री. निखिल नरेश कुसुमगर, मे. डोर्लीकर वाईन शॉप या आस्थापनांचा समावेश आहे.
धरमपेठ झोन : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या दोन खासगी शिक्षण संस्थानांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. यात मे. आकाश इन्स्टिटयूट आणि मे. फिजिक्सवाला या दोन खासगी शिक्षण संस्थानांचा समावेश आहे. शहरात सुरु असलेल्या धडक कार्यवाहीच्या अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली असून नियमभंग करणाऱ्या आस्थापनेच्या विरोधात कडक पवित्रा घेण्यात येत आहे.