मनपाचा रोखे उभारणीचा मार्ग झाला मोकळा : महापौर
Date : 24 Aug 2026
नागनदी प्रदुषण निर्मुलन प्रकल्पातील म.न.पा. चा हिस्सा रू. ३०१ कोटी पैकी रू.२००.०० कोटी रोखे (बॉण्ड) माध्यमातुन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, रोखेच्या माध्यमातून निधी उभारण्याचा निर्णय मनपाने घेतला असून सदर रोखे (बॉन्ड) उभारणी करता मनपाला पतमानांकन करून घेणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने म.न.पा. ने इंडिआ क्रेडीट रेटींग या एजन्सीची नेमणूक केलेली होती. सदर एजन्सीने म.न.पा. चे मागील ५ वर्षाचे आर्थिक विवरण पत्रके तसेच अंदाजपत्रके व इतर आवश्यक माहिती यांची तपासणी करून म.न.पा. ला रोखे (बॉन्ड) उभारणी करता AA+/Stable पतमानांकन दिलेले असून, सदर पतमानांकन नागरी स्थानिक स्वराज्या संस्था यातील सर्वोच्च पत मानांकन आहे. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी रोखे उभारण्याच्या संदर्भात मनपाच्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती.
Back To Home Page
मा. महापौर निता ठाकरे, मा. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मा. आयुक्त डॉ. विपीन, मनपाचे प्रलेविअ श्री. सदाशिव शेळके व त्याचप्रमाणे म.न.पा.चे आर्थिक सल्लागार मे. ए. एस. कुलकर्णी अॅण्ड असोसिएट्स यांनी सदर पतमानांकन मिळवण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे.