विविध स्पर्धांनी रंगला ‘महापौर श्रावण उत्सव
कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
Date : 26 Aug 2026
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, क्रीडा विशेष समिती सभापती सौ. दर्शनी धवड, जलप्रदाय विभाग सभापती श्रीमती दिव्य धुरडे, लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती लक्ष्मी यादव, विधी समिती सभापती कु. निधी तेलगोटे, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, नगरसेविका श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती माया हाडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, माजी नगरसेविका श्रीमती मीनाक्षी तेलगोटे, श्रीमती वर्षा ठाकरे, श्रीमती विशाखा बांते, श्रीमती पल्लवी श्यामकुळे, श्रीमती विनिता दांडेकर, क्रीडा विभागाच्या श्रीमती उज्ज्वला चरडे मनपा कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांना सुरुवात होते. त्यामुळे महिलांसाठी काहीतरी वेगळे आणि आनंददायी आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना नवी ऊर्जा, नवीन व्यासपीठ आणि आनंद मिळावा, हाच या आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध स्पर्धांनी रंगली श्रावणाची रंगत
कार्यक्रमात ‘श्रावण क्वीन’, ‘फुल राणी’, ‘तुझी माझी जोडी’ आणि ‘रंग माझा हिरवा’ अशा विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच श्रावण गीते, नृत्य, विविध खेळ, फॅशन शो आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. यावेळी श्रीमती विना धोटे, श्रीमती दमयंती गोल्हर, श्रीमती गीतांजली बनकर, श्रीमती भारती शेंडे, श्रीमती मानसी बिसेन यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. सर्व विजेत्या महिलांना पैठणी साडी व डिनर सेट देऊन गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमय लोखंडे यांनी केले.