अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात मनपाची नोटीस कार्यवाही
मनपाद्वारे मेहेंदीबाग पुलाच्या खालील परिसर अतिक्रमण मुक्त
Date : 28 Aug 2026
महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणांची व अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रेस्टोरेंट, दुकाने व ठेले या आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
लकडगंज झोन: लकडगंज झोन अंतर्गत शास्त्रीनगर परिसरांतील अवैध बांधकाम व अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. त्यानुसार येथील अतिक्रमण करणाऱ्या प्लॉट नं.३२३, द प्रिजम अपार्टमेंटच्या ७ व्या माळ्यावरील मे. श्री सोमरस रेस्टोरेंट बार आस्थापनेला संबंधित कार्यवाही करून नोटीस देण्यात आले आहे. यावेळी सहायक आयुक्त श्री. विजय थूल उपस्थित होते.
सतरंजीपुरा झोन : सतरंजीपुरा झोन अंतर्गत मेहेंदीबाग पुलाच्या खालील परिसरात काही नागरिकांनी अनधिकृतपणे कब्जा करून वास्तव्य केल्याचे व परिसरात काही अनधिकृत दुकानेही उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर कारवाई करत संबंधितांचे अनधिकृत साहित्य व दुकाने हटवून परिसर रिकामा केला. यामुळे मेहंदीबाग पूलाच्या खालील परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.