महापौर निता ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिले मनपाच्या मारबत महोत्सवाचे निमंत्रण
Date : 30 Aug 2026
यापूर्वी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी देखील दिल्लीत मध्ये जाऊन विविध मान्यवरांना नागपूरच्या या ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे अधिकृत निमंत्रण दिले होते. विशेष म्हणजे, नागपूरची ऐतिहासिक संस्कृती जपणाऱ्या आणि १४५ वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मारबत महोत्सवासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांच्या देखरेखीत मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी केल्या जात आहे. त्यातच एक भाग म्हणून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना महोत्सवासाठी निमंत्रित केले जात आहे. महोत्सवात नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहावा आणि शहराचे वैभव जगासमोर यावे, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे.