गुरूवार ३ सप्टेंबर रोजी मनपाची शाडू मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळा
गणेश मंडप परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा
Date : 31 Aug 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णतः नि:शुल्क असून,विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने शाडू मातीची पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती घडविण्याचा अनुभव मिळणार आहे.
सहभागी होण्यासाठी https://nagpur-green-kids.emergent.host या लिंकवर नोंदणी करावी. तसेच प्रत्येक गणेश मंडळातील एका प्रतिनिधीने या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश मंडप परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडप परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या वापराबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे झोननिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित झोनच्या समस्यांसाठी लक्ष्मी नगर झोनचे श्री. कौशल सराफ (+91 98606 46909), धरमपेठ झोनचे श्री. पी. जी. मोकाडे ( +91 99233 88095), हनुमान नगर झोनचे श्री. दीपक मेश्राम (+91 98230 98354), धंतोली झोनचे श्री. विवेक तेलरांधे (+91 98237 17860), नेहरू नगर झोनचे श्री. प्रफुल्ल असलकर (+91 99232 09423), गांधीबाग-महाल झोनचे श्री. पुरुषोत्तम फाळके (+91 98503 16520), सतरंजीपुरा झोनचे श्री. मंगेश गेडाम (+91 99230 20706), लकडगंज झोनचे श्री. विजेंद्र सहारे (+91 99233 85107), आशी नगर झोनचे श्री. प्रदीप सरपाटे ( +91 99233 86655) आणि मंगलवारी झोनचे श्री. प्रशांत नेहारे (9823527788) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, ऑनलाइन पोर्टलसंदर्भातील तांत्रिक अडचणींसाठी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे (9823811927) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.