महिला व बालकल्याण विशेष समितीची बैठक
विविध विषयांवर सविस्तर चर्चा
Date : 31 Aug 2026
बैठकीत उपसभापती श्रीमती तारा (लक्ष्मी) यादव, समिती सदस्य श्रीमती चेतना निमजे, समिती सदस्य श्रीमती माहेश्वरी बिसेन, समिती सदस्य श्रीमती कल्पना द्रोणकर,समिती सदस्य कुमारी लक्ष्मी हत्तीठेले, समिती सदस्य तासणीम परवीन नियामत खान ताजी, समिती सदस्य श्रीमती शिला तराळे, मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. दीपक सेलोकर, बालविकास प्रकल्प अधिकारी (दक्षिण) श्री. रणजित कुऱ्हे, बालविकास प्रकल्प अधिकारी (उत्तर) श्रीमती रूपा मोहितकर, बालविकास प्रकल्प अधिकारी (पश्चिम) श्रीमती भारती मानकर, बालविकास प्रकल्प अधिकारी (पूर्व) अपर्णा कोल्हे, उपशिक्षण अधिकारी श्रीमती सीमा खोब्रागडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत समिती सभापतींद्वारे शहरातील अंगणवाडी केंद्रची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि अडचणींचा आढावा घेण्यात आला. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी (दक्षिण) श्री. रणजित कुऱ्हे यांनी शहरातील विविध भागातील अंगणवाडींची माहिती दिली. तसेच महानगरपालिका द्वारा वापरात नसलेल्या इमारतींना अंगणवाडीच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी सदस्यांनी महिला समुपदेशन कार्यशाळा संदर्भात चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना कायदेविषयक आणि सुरक्षाविषयक माहिती व जागृती करण्यासह कौटुंबिक समस्यांचे समजूतीने निराकरण करण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गरजू महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता यावी यासाठी मनपातर्फे शिवणयंत्र वाटप योजनेवर अंमल करण्यासाठी दिलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात आला यावेळी, लवकरच वाटप करता येणार असून गरजूंना देण्यात येईल अशी माहिती मिळाली. संबंधित योजनेतील शासकीय, निमशासकीय अथवा इतर संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक या नियमाला शिथिल करून अनुभव प्रमाणपत्रांना समाविष्ट करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली.