महिलांच्या उत्साहाला मिळाला श्रावणी साज
‘महापौर श्रावण उत्सव’ रंगला आनंदात
Date : 01 Sep 2026
कार्यक्रमात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या प्रेरणेतून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच दैनंदिन आयुष्यात चार क्षण सुखाचे अनुभवता यावे व त्याचा आनंद लुटता यावा याकरीत श्रावण उत्सव आयोजित करण्याचे करता आल्याचे समाधान व्यक्त केले.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. श्रावण महिन्याचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा, गीत-संगीत आणि विविध स्पर्धांमुळे संपूर्ण वातावरण उत्सवी झाले.
श्रावण हा केवळ धार्मिक विधी आणि उपवासाचा महिना नसून, भारतीय संस्कृतीतील उत्सवप्रियता आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा काळ आहे. कुटुंब, मुलं आणि नोकरी-व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी परिवहन समिती सभापती श्रीमती मांंा लगा खेकरे क्रीडा विशेष समिती सभापती सौ. दर्शनी धवड,वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लड्ढा, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, सतरंजीपूरा झोन सभापती श्रीमती अभिरुची राजगिरे, लकडगंज झोन सभापती श्रीमती माहेश्वरी बिसेन, नेहरूनगर झोन सभापती श्रीमती सीमा ढोमणे, माजी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, माजी उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, नगरसेविका श्रीमती शीतल लालोरकर, नगरसेविका श्रीमती चेतना निमजे, नगरसेविका श्रीमती रंजनी वाघमारे, नगरसेविका श्रीमती दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेविका श्रीमती अर्चना पडोळे, नगरसेविका श्रीमती शारदा बारई, माजी नगरसेविका श्रीमती वैशाली रोहणकर, माजी नगरसेविका श्रीमती कांता रारोकर, श्रीमती संध्या कृष्णा खोपडे, तसेच क्रीडा विभागाच्या श्रीमती उज्ज्वला चरडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.