मनपाची शाडू मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळा ३ सप्टेंबर २०२६ रोजी
Date : 02 Sep 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, ,परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लड्ढा, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती सभापती श्रीमती रुतिका मसराम, विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, अग्निशमन व विद्युत विभाग विशेष समिती सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. राजेश भगत, शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या विशेष उपस्थितीत विद्यार्थ्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णतः नि:शुल्क असून,विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने शाडू मातीची पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती घडविण्याचा अनुभव मिळणार आहे.