नेहरूनगर झोनद्वारे एकाच दिवसात १२ लाख रुपयांची थकीत कर वसुली
मनपाची मोठी कारवाई
Date : 03 Sep 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम करीत आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर तथा कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
मालमत्ता कर वसूली अभियानांतर्गत नेहरूनगर झोन परिसरातील मे. विठोबा लॉन या व्यावसायिक आस्थापनेकडे १ एप्रिल २०२२ - ३१ मार्च २०२६ या कालावधीत ५ लाख ४८ हजार ४८० रुपयांची थबकबाकी प्रलंबित होती. मालमत्ता कराच्या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याचे सांगत वारंवार महानगरपालिकेची दिशाभूल करत होते. महापालिकेद्वारे आस्थापनेविरोधात चल-अचल मालमत्ता जप्ती वारंट बजावून प्रत्यक्ष कारवाई सुरु होताच आस्थापनेद्वारे थकीत कराची संपूर्ण रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच माजी पोलीस कर्मचारी श्री. महादेवराव डाखोरे यांच्याकडे थकीत असलेल्या कराची भरपाई न झाल्याने त्यांच्या मालमत्तेतील नळ जोडणी खंडित करणे व कार्यालयातील साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली असता जागेवरच ६ लाख ५५ हजार ९९३ रुपयांच्या थकीत कराची भरपाई करण्यात आली.