केंद्रीय मंत्री गडकरींनी केला मोहम्मद इस्राईल यांचा सत्कार
Date : 04 Sep 2026
नागपूर महानगरपालिकेच्या नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे तांत्रीक सल्लागार श्री. मोहम्मद इस्त्राईल यांचा केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सत्कार केला.
Back To Home Page
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी श्री. इस्त्राईल यांच्या कामाची प्रशंसा केली. नाग नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकार तसेच जिकाकडून मंजूर मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच यापुढेही केंद्र सरकारकडे नागपूरचे प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी श्री. इस्त्राईल यांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.