आपली बस आता नागपूर ते आदासा मंदिर: प्रायोगिक तत्वावर बस सेवा सुरू
Date : 04 Sep 2026
मा. परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे व मा आयुक्त डॉ विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने ४ सप्टेंबर २०२६ पासून मोरभवन (आपली बस टर्मिनल) ते आदासा मंदिर (मार्गे खंडाळा व सिल्लोरी) या मार्गावर प्रायोगिक तत्वावर आपली बस सेवेचा शुभारंभ केला आहे. या नवीन सेवेमुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार असून, प्रसिद्ध आदासा मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी एक सोयीस्कर, आरामदायक आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
नवीन बस सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये:
* मार्ग: मोरभवन (आपली बस टर्मिनल) ते आदासा मंदिर (मार्गे खंडाळा व सिल्लोरी).
* फेऱ्या: दोन्ही बाजूंनी दररोज ४ फेऱ्या.
* तिकीट दर: पूर्ण तिकीट – ₹६८ | हाफ तिकीट – ₹३५.
* उद्दिष्ट: ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि आदासा मंदिरासाठी सुलभ प्रवास सुविधा निर्माण करणे.
बसच्या वेळापत्रकाचा तपशील:
* मोरभवन (आपली बस टर्मिनल) ते आदासा मंदिर:
सकाळी ०६:३० | सकाळी ०९:३० | दुपारी ०२:०० | सायंकाळी ०५:००
* आदासा मंदिर ते मोरभवन (आपली बस टर्मिनल):
सकाळी ०७:५० | सकाळी १०:५० | दुपारी ०३:२० | सायंकाळी ०६:२०