धरमपेठ झोन अंतर्गत अनधिकृत रस्ता फुटपाथवरील अनधिकृतपणे लावण्यात आलेले दुकांनांवर कारवाईबाबत
Date : 08 Sep 2026
नागपूर महानगरपालिका, धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि. 08/09/2026 रोजी केलेल्या अतिक्रमण कारवाई आमदार निवास, सिव्हील लाईन्स, तेलंगखेडी, आरटीओ रोड, व्हीयंआईटी, यशवंत स्टेडियम येथे धरमपेठ झोन अंतर्गत रस्ता फुटपाथवरील अनधिकृतपणे लावण्यात आलेले दुकांनांवर कारवाई करण्यात आली.
Back To Home Page
सदर कारवाई मा.आयुक्त मनपा नागपूर, मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाही मध्ये उपस्थित होते. कारवाई दरम्यान मोठया प्रमाणात सामान जप्त करण्यात आले व फुटपाथवरील पाल शेड काढण्यात आले व अतिक्रमण धारकांना ताकीद देण्यात आली की फुटपाथ मोकळे करावे. यापुढे अश्याच प्रकाराची धरमपेठ झोनच्या विविध परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल. पुन्हा पुन्हा त्याच जागी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.