फ्रेंड्स कॉलनीतील, गंगा नगर, अनधिकृत बुधवार बाजारा गेल्या दोन आठवड्या पासून लावण्यात मनाई.
Date : 09 Sep 2026
या समस्येची गंभीर दखल घेत आज दिनांक 09/09/2026 नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन पथकाने परिसरात धडक अतिक्रमण विरोधी कारवाई केली आणि बाजार भरू दिला नाही.
तथा RTO परिसरेथील ‘RTOपरिसरातील बिर्याणी दूकानावर’ कारवाई करून FIR दाखल कारण्यात येत आहे.
यापुढे या मुख्य रस्त्यावर कोणताही आठवडी बाजार किंवा भाजीपाला विक्रेत्यांना बसू दिले जाणार नाही, अशी कडक ताकीद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मनपाच्या या धडक निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून धर्मपेठ झोनच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
सदर कारवाई मा.आयुक्त मनपा नागपूर, मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त श्री राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.