'मारबत महोत्सव' शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी
मनपातर्फे जय्यत तयारी
Date : 10 Sep 2026
महोत्सवाची सुरुवात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख हस्ते पिवळी व काळी मारबत यांची विधिवत पूजा करून झाली आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित मारबत महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मनपाच्या विभाग प्रमुखांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शहराच्या विविध भागांत खालील प्रमुख चौकांमध्ये मारबत उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. मनपाचा मुख्य कार्यक्रम गांधीपुतळा चौक येथे होणार आहे. तर मनपाद्वारे स्वागत गेट, संपूर्ण महोत्सव मार्गाची सजावट, मारबतचे स्वागत, स्वागत मंच आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.
मनपातर्फे स्वागत मंच
Ø पिवळी मारबत कुंभारपुरा चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक, शहीद चौक व टांगा स्टँड चौक, गांधीपुतळा चौक (मुख्य कार्यक्रम स्थळ), कोतवाली चौक, मस्कासाथ छोटेलाल हलवाई समोर स्वागत मंच उभारण्यात येणार आहे
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती
१४५ वर्षांचे गौरवशाली ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मारबत महोत्सवाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मनपातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालक मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री. आशिष जैस्वाल तसेच परदेशातून वाणिज्य राजदूत (Consul General), विविध देशांचे प्रतिनिधी, इतर मानननीय मंत्री महोदय, सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते उपस्थित राहणार आहेत. यात फ्रान्स, इटली, फिनलंड, नॉर्वे यांच्या मा.वाणिज्य राजदूत यांचा समावेश आहे. तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. सुभाष घई, श्री. जय मेहता, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ, श्रीमती आरती वेले, श्री. अकुश चौधरी, श्री. उमेश यादव संपादक श्री. निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेषः म्हणजे, नेहरू पुतळा चौकात मा.वाणिज्य राजदूत यांना मिलन बघता यावे याकरीत बिल्डींगवर व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युसीएन वर केले जाणार आहे.