नियमित लसीकरणापासून माता व बालक वंचित राहू नये ; लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा अतिरिक्त आयुक्त श्री. अंकीत यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश
नियमित लसीकरण, सर्वेक्षण व आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत आढावा!
Date : 10 Sep 2026
या बैठकीस मा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,माता व बाळसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री चन्ने, डॉ. सुनील कांबळे,डॉ. गजानन पवाने, डॉ वर्षा देवस्थळें, एम.एस.यू चे सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथुन खेरडे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. संदीप भोयर, पी.एच.एन श्रीमती अर्चना खाडे, श्रीमती दिपाली गणोरकर, श्रीमती दिपाली नागरे , श्री. प्रफुल्ल किन्हीकर, क्षेत्र लसीकरण नियंत्रण श्री. संदीप फुंडे, श्री. प्रमोद दहाट, सौ.सोनल सियाग, सौ मोनाली बावनकर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ.चैती हटवार,डॉ.शुंभांगी कुंभारे,डॉ.दिव्या बनकर, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी डॉ.समीक्षा काळंबे , डॉ.मंजुषा सिनकर डॉ.अक्षय पाटील एस.यू.चे संवाद तज्ज्ञ श्री. स्नेहल करंजेकर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी व तज्ज्ञ उपस्थिती होते.
बैठकीत नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
तसेच HPV लसीकरण मोहिमेला अधिक गती देऊन पात्र मुलींचे लसीकरण पूर्ण करावे आणि यासाठी जनजागृती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत असे निर्देश माता व बाळसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांनी दिले. HIMS आणि U-WIN पोर्टलवरील Full Immunized Entry मधील तफावत दूर करून जुलै ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील सर्व प्रलंबित नोंदी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
AFP (Acute Flaccid Paralysis) Surveillance अंतर्गत संशयित रुग्णांचे नमुने निर्धारित वेळेत प्रयोगशाळेत पाठविणे तसेच संबंधित रुग्णालयांकडून साप्ताहिक अहवाल नियमितपणे प्राप्त होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
MR (Measles-Rubella) Surveillance अंतर्गत संशयित रुग्णांचे आवश्यक व योग्य नमुने (Adequate Specimen) संकलित करणे तसेच नमुना संकलनासाठी VTM चा योग्य वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश मा. अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Vaccine Preventable Diseases (VPD) Surveillance अंतर्गत झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या Active Case Surveillance (ACS) भेटींचे प्रमाण ८९ टक्के असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश मा. अतिरिक्त आयुक्तांनी दिले.
बैठकीदरम्यान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील मातामृत्यू, बालमृत्यू बाबतचा आढावाही घेण्यात आला. माता व बाल आरोग्य सेवांमध्ये आवश्यक सुधारणा, वेळेवर संदर्भ सेवा आणि प्रभावी समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीच्या शेवटी मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना नियमित आढावा, प्रभावी समन्वय आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून लसीकरण, रोग सर्वेक्षण व सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.