दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील एकात्मिक आरोग्य समितीची बैठक संपन्न
UPHC सक्षमीकरणासाठी औषधांचा नियमित पुरवठा, रिक्त पदे भरणे, वैद्यकीय उपकरणे व पायाभूत सुविधांवर भर
Date : 10 Sep 2026
बैठकीच्या प्रारंभी समितीच्या सदस्यांचा तसेच नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला. यानंतर लक्ष्मीनगर व धंतोली झोनमधील आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी समितीचे सदस्य श्रीमती. तारा (लक्ष्मी)यादव, नगरसेवक श्री.सुनील दांडेकर, श्री.रितेश गावंडे,श्री. मोरेश्वर उर्फ मनोज साबळे,श्री. रमेश भंडारी, नगरसेविका श्रीमती. माया हाडे, कु. निधी तेलगोटे,श्रीमती. वर्षा चौधरी, सहाय्यक आयुक्त श्री.धनंजय जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर,माता व बाळसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड,झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. शीतल वंदिले, झोनल अधिकारी डॉ ऋषिकेश इंगळे ,इंधिरा गांधी रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा खंडागळे,एन,यू.एच.एम.चे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम,,पी.एच.एन श्रीमती अर्चना खाडे, यांच्यासह इतर संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत संबंधित झोनमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, UPHC निहाय मागणीपत्रे, आवश्यक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, बांधकाम व दुरुस्तीची बाबत कामे तसेच लोकप्रतिनिधी व नगरसेवकांकडून प्राप्त सूचना व अभिप्रायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आरोग्य केंद्रांमध्ये औषधांची उप्लब्धबाबाबत, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता, बांधकाम व दुरुस्तीची कामाबाबत प्रस्ताव सादर करणे तसेच केंद्रांवर आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला..
नवीन शासनाच्या निर्णयानुसार आउटसोर्सिंगद्वारे आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय रिक्त असलेल्या आशा वर्करच्या जागांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
अपुऱ्या जागेतील UPHC / UHWC चे स्थलांतर
काही UPHC व UHWC भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये सुरू असून रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जागा अपुरी पडत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आली. यावर मा. अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेची पाहणी करून प्रशस्त व योग्य जागा लवकर उपलब्ध करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, जेणे करून भविष्यात नवीन बांधकाम करणे सोयीचे होईल
तसेच IGR रुग्णालयाशी संबंधित आवश्यक उपकरणे व साहित्याची यादी मागणीपत्राद्वारे सादर करण्याचे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना अधिक सुलभ, दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी असे यावेळी निर्देशित करण्यात आले.