मारबत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री. सुभाष घई यांचे संत्रानगरी आगमन
Date : 10 Sep 2026
मारबत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री. सुभाष घई यांचे गुरुवारी (ता. १०) सायंकाळी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
Back To Home Page
यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे, नगरसेविका मायाताई हाडे, वर्षा चौधरी, नगरसेवक नागेश मानकर, अशोक शामकुळे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. विवेक रानडे तसेच श्री. दिनेश आचार्य उपस्थित होते.