मारबत महोत्सवानिमित्त छायाचित्र स्पर्धेचे निकाल घोषित
Date : 11 Sep 2026
ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे अध्यक्ष श्री. महेश काळबांडे, ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे सचिव श्री. नरेश नेरकर, ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे कोषाध्यक्ष श्री. नितेश बाहे तसेच कलुबचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपाद्वारे आयोजित प्रदर्शनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. नागरिकांनी विविध सुंदर छायाचित्रांचा डोळे भरून आनंद घेतला. मारबत समयीचे विविध दृश्य, जनतेच्या उत्साहात मारबतीचे आगमन ते मारबतीला दहन करण्यापर्यंतचे निरनिराळे क्षण, यावेळी स्थानिक संस्कृतीतील प्रात्यक्षिकांचे असे अनेक कलात्मक आणि नाविन्यपूर्ण छायाचित्रांनी भरलेल्या प्रदर्शनाला बघण्याचा आनंद घेतला.
विशेष म्हणजे, जुन्या काळापासून तर मागील वर्षीच्या मारबत उत्सवातील क्षणापर्यंत अनेक छायाचित्र विविध छायाचित्रकारांच्या माध्यमातून टिपून प्रदर्शनीत निवडण्यात आले होते. सोबतच छायाचित्र स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला.
श्री. अनिरुद्ध सिंग दिनोरे हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. द्वितीय पुरस्कार श्री. राहुल मिश्रा, तृतीय पुरस्कार श्री. युगल सावरकर, प्रथम उत्तेजनार्थ श्रीमती स्नेहल सोनटक्के, तर द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार श्री. देवांशु उकळे यांना मिळाला. स्पर्धेचे परीक्षण छायाचित्रकार श्री. नाना मिसाळ व छायाचित्रकार श्री. विनोद राऊत यांनी केले.