श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत गणेश मंडळांच्या सहकार्याने आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन
Date : 13 Sep 2026
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस, नागपूर यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सेवा, आरोग्य तपासणी, आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच शासकीय आरोग्य योजनांबाबत माहिती देण्यात येणार
या अभियानाच्या नियोजनाच्या अनुषंगाने मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस मनपाच्या सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरांचे नियोजन, संबंधित रक्तपेढ्यांशी समन्वय, रक्तसंकलनाची व्यवस्था तसेच गणेश मंडळांच्या सहभागाबाबत सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले
हे उपक्रम नागपूर महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या प्रोत्साहनात्मक पाठिंब्यामुळे यशस्वीपणे राबविण्यात येणार असून, मा. उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, मा. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, मा. सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, मा. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे, मा. आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि अतिरिक्त आयुक्त श्री अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या देखरेखीखाली राबविण्यात येणार आहे
झोननिहाय रक्तपेढ्यांची व्यवस्था
रक्तदान शिबिरांचे नियोजन नागपूर महानगरपालिकेच्या विविध झोननुसार करण्यात आले असून संबंधित झोनमध्ये उपलब्ध रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात येणार आ
लक्ष्मीनगर झोन क्र. १ : जीवन ज्योती रक्तपेढी व जी.एस.के. रक्तपे
धरमपेठ झोन क्र. २ : लाईफ लाईन रक्तपेढी, हेडगेवार रक्तपेढी व रेनबो रक्तपेढी
हनुमाननगर झोन क्र. ३ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपे
धंतोली झोन क्र. ४ : सिहो ब्लड बँ
नेहरूनगर झोन क्र. ५ : साईनाथ ब्लड बँ
गांधीबाग झोन क्र. ६ : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी व अमन ब्लड बँ
सतरंजीपुरा झोन क्र. ७ : मेट्रो ब्लड सेंटर डागा व डिस्ट्रिक्ट ब्लड बँ
लकडगंज झोन क्र. ८ : सुपर स्पेशालिटी ब्लड बँ
आशीनगर झोन क्र. ९ : तिरपुडे रक्तपेढी
मंगळवारी झोन क्र. १० : अर्पण रक्तपेढी व आयुष रक्तपे
रक्तदान शिबिरांचे आयोजन संबंधित झोननिहाय रक्तपेढ्यांच्या समन्वयाने करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे
‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक आरोग्याचा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे