नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार ते शनिवार (ता.06 सप्टेंबर ते 12सप्टेंबर) शोध पथकाने 310 प्रकरणांची नोंद करून 2,10,000 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 19 प्रकरणाची नोंद करून 9,500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 130 प्रकरणांची नोंद करून 52,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून रू.700 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 35 प्रकरणाची नोंद करून 14,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचेहॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 20 प्रकरणाची नोंद करून 40,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ , मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वैद्यकीय व्यवसायिकांनी बायोमेडीकल वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 25,000 रूपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 7,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून रू.35,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 74 प्रकरणांची नोंद करून 14,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे 2 प्रकरणाची नोंद करून रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. बायोमेडीकल वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 25,000 चे दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 11 प्रकरणाची नोंद करून रू.55,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे 7 प्रकरणांची नोंद करून रू.70,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे 1 प्रकरणांची नोंद करून रू. 5,000 चे दंड वसुल करण्यात आले. अनधिकृतपणे बोरवेलचे काम करणे, पिठगिरणी व जुन्या इमारतीला पाडण्याचे काम इत्यादी कारणाने वायु प्रदुषण होत असल्याने 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 12 प्रकरणाची नोंद करून 60,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील डेबरीज/साहित्यध् कचरा टाकून अडथळा निर्माण करणे किंवा क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 36 प्रकरणांची नोंद करून रू.2,35,000 दंड वसुल केला.