टॉवरवर चढलेल्या व्यक्तीची अग्निशमन विभागामार्फत सुखरूप सुटका
Date : 15 Sep 2026
प्राप्त माहितीनुसार सिव्हील अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन क्रमांक MH-31- FC- 2825 तसेच MH-31-FC-0262 (TTL)वाहना सोबत अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. व सदर पथक 11:49 वाजता घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पाहणी केली असता एक व्यक्ती टॉवरवर चढलेली असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन TTL (Turntable Ladder) च्या सहाय्याने उप अग्निशमन अधिकारी श्री. मानके, श्री. राजूरकर, चा. यं. चा. श्री नयन पेठे, कं. अग्नि. वि. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्यासह सदर व्यक्तीच्या बचावासाठी टॉवरच्या दिशेने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.
रेस्क्यू पथक व्यक्तीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करीत असताना सदर व्यक्ती खाली येण्यास नकार देत होती व पथक जवळ जाताच ती व्यक्ती टॉवरवरच्या वरच्या दिशेने वर चढत होती. टॉवरवरील वायरिंग व इतर अडथळ्यांमुळे TTL ची केज व्यक्तीच्या जवळ नेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत सदर व्यक्तीच्या जवळ पोहोचून तिला पाणी व नाश्ता देण्यात आला. तसेच त्याला विश्वासात घेऊन शांतपणे संवाद साधत खाली येण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यक्ती खाली येण्यास तयार नव्हती.
त्यानंतर TTL खाली आणून पुढील रेस्क्यू ऑपरेशन बाबत संपुर्ण टिम द्वारे आवश्यक नियोजन व रणनीती आखण्यात आली. नियोजनानुसार अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पुन्हा टॉवरवर गेले. यामध्ये TTL च्या केजमधून एक अधिकारी व कर्मचारी टॉवरवर चढले, तसेच टॉवर वरच्या शिडीने एक कर्मचारी टॉवर वर चढला व असे तिन् कर्मचा-याने सदर व्यक्तीला पकडुन केज मध्ये टाकुन रेस्कयु करुन 14:18 वा. खाली आणण्यात यश आले.
सदर व्यक्तीचे नाव:- श्री. किशोर ऊर्फे मोनु बरसन सिंन्हा
वय अंदाजे 20 वर्ष
रा. बोरतारा पोस्ट तिरुर,
तह. गुरुर बालोद, जिल्हा छत्तीसगड
सदर व्यक्तीला रेस्क्यु करुन वरीष्ठ पोली निरीक्षक,अंबाझरी पोली स्टेशन व त्याची टिम यांच्या स्वाधिन करण्यात आले.