पथविक्रेता मसुद्याबाबत ३० सप्टेंबर पर्यंत 'हरकती व सूचना' सादर कराव्या
बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांचे आवाहन
Date : 17 Sep 2026
राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी एकसमान व सर्वसमावेशक पथविक्रेता योजना तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यासंदर्भात गुरुवारी (ता.१७) आयुक्त डॉ. विपीन यांच्या सभा कक्षात बैठक पार पडली. बैठकीत स्थानिक प्राधिकरण व नगर पथविक्रेता समितीशी सल्ला मसलत करून पथविक्रेता योजनेबाबत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आहे.
Back To Home Page
बैठकीत मनपाचे उपायुक्त (बाजार) श्री. मंगेश खवले, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. गिरीश बाणे, पथ विक्रेत्यांचे प्रतिनिधी श्री. अब्दुल रज्जाक कुरेशी मो. शेखजी कुरेशी यांच्यासह इतर सदस्य व मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, हरकती व सूचनाच्या संदर्भातील मसुदा हा मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nmcnagpur.gov.in/ उपलब्ध आहे. असेही आयुक्त यांनी स्पष्ट केले.