मनपाच्या भव्य रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
२०१ हून अधिक युनिट रक्त संकलन
Date : 17 Sep 2026
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिनाभर शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लड्ढा, नगरसेवक श्री. शैलेश पांडे, नगरसेवक श्री. अभिजित झा, मनपा उपायुक्त श्री. राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. नरेंद्र अहिलवार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती दिपाली नागरे, पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रवी चौधरी, नागपूर स्मार्ट सिटीचे स्वतंत्र संचालक श्री. आशिष मुकीम, तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रियांक छाजेड, सचिव श्री. विनय अंचलिया, श्री. तनुज सेठिया, श्री नितेश छाजेड, श्री. लव्हेश डागा, अर्पण रक्तपेढी चे संचालक श्री. सत्यम सिंग, डॉ. स्वप्नील चौरे, श्रीमती स्वाती जंजाड़, श्रीमती नंदिनी पाटणकर, श्री. सचिन कासार, रेनबो रक्तपेढीच्या संचालिका डॉ. रश्मी वर्मा, डॉ. संजय पराते, विभाग प्रमुख श्रीमती उज्वला दारोडकर, श्रीमती शीतल भेंडारकर, श्रीमती शिल्पा वर्षिकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एआयएमआयएमचे गटनेते श्री. शकील पटेल यांनी रक्तदान केले.
शिबिरामध्ये रक्तदात्यांची नोंदणी, प्राथमिक तपासणी तसेच रक्त संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. अर्पण रक्तपेढी आणि रेनबो रक्तपेढी यांच्या वैद्यकीय पथकाकडून रक्तदात्यांची आवश्यकता तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलित करण्यात आले. मनपाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि सर्व सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. सकाळी सुरु झालेल्या या शिबिरामध्ये रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळाली. शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत रक्तदान केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले.
महापौर श्रीमती निता ठाकरे, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच या शिबिरासाठी आपल्या चमू सह आलेल्या तेरापंथ युवक परिषद, अर्पण रक्तपेढी आणि रेनबो रक्तपेढीचे ही अभिनंदन व कौतुक केले. ‘एक थेंब आशेचा’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचा उद्देश रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे.
यावेळी तेरापंथ युवक परिषद, अर्पण रक्तपेढी आणि रेनबो रक्तपेढी यांनी या समाजहिताच्या उद्दिष्टाने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजना करिता महापौर श्रीमती निता ठाकरे, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.