धरमपेठ झोन अंतर्गत अनधिकृत रस्ता फुटपाथवरील अनधिकृतपणे लावण्यात आलेले दुकांनांवर कारवाई
Date : 17 Sep 2026
नागपूरचे मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार, पुढील १५ दिवसांत शहरातील एकूण १० किलोमीटरच्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रणे हटवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आजची ही कारवाई याच मोहिमेचा एक भाग होती.
सदर कारवाई मा.आयुक्त मनपा नागपूर, मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.
नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात सुबत्ता आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.