महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते "स्वच्छता ही सेवा" अभियानाचा शुभारंभ
Date : 17 Sep 2026
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने 'स्वच्छता ही सेवा २०२६' अभियानाचा शुभारंभ आज(ता.१७) झोन क्र. ५, प्रभाग क्र. २६, आदर्श नगर, बुद्ध विहारजवळ, नागपूर येथे विशेष स्वच्छता व सौंदर्यीकरण उपक्रमाद्वारे करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ महापौर निता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नगरसेवक विजय( पिंटू) झलके, विभागीय अधिकारी श्री. आनंद खोडस्कर, पीआययु चमूचे सदस्य तसेच स्थानिक नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य लाभले.
Back To Home Page
स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित या अभियान शुभारंभ प्रसंगी स्थानिक जीव्हीपी पॉईंटवर विशेष स्वच्छता व सौंदर्यीकरण मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी आकर्षक भित्तीचित्रे व संकल्पनेवर आधारित रांगोळी साकारून परिसराला स्वच्छ, सुंदर व आकर्षक स्वरूप देण्यात आले. तसेच स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानाशी संबंधित जनजागृतीपर संदेशांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.