नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘आशीर्वाद का दिया’ अभियान उत्साहात संपन्न
Date : 17 Sep 2026
या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवार (दि. १७ सप्टेंबर) रोजी शहरातील सर्व १० झोनमधील ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), १०२ नागरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC), आयसोलेशन रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘आशीर्वाद का दिया’ अभियान उत्साहात, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आले.
लकडगंज झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवरी नगर येथे मनपाच्या मा. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
हे अभियान नागपूर महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या प्रोत्साहनात्मक पाठिंब्यामुळे यशस्वीपणे राबविण्यात आला असून, मा. उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, मा. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, मा. सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, मा. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे, मा. आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि अतिरिक्त आयुक्त श्री अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आला होता.
यावेळी ‘आशीर्वाद का दिया’ प्रज्वलित करून सेवा, समर्पण व जनकल्याणाचा संदेश देण्यात आला. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील UPHC व UHWC येथे दीप प्रज्वलित करून अभियानात सहभाग नोंदविला.
यावेळी मा. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष सभापती श्रीमती मनीषा अतकरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी घरत, एम.एस.यू.चे संवाद तज्ज्ञ श्री. स्नेहल करंजेकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.