मनपा शाळांमधील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
Date : 28 Sep 2026
मनपा शाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता दिनांक १०.०५.२०२७ पर्यंतच्या उर्वरित ८ महिन्यांच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र, लागू झालेल्या आचारसंहितेच्या नियमांचे पालन करत प्रशासनाने ही भरती प्रक्रिया तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील सर्व मनपा शाळांच्या मुख्याध्यापकांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी. आचारसंहिता लागू असेपर्यंत शाळा स्तरावर या भरती संदर्भात कोणतीही पुढील कार्यवाही किंवा हालचाल करू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे यांनी आले आहेत.
आदर्श आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि निवडणूक कार्यक्रम समाप्त झाल्यावर, या भरती प्रक्रियेचे सुधारित व पुढील वेळापत्रक आवश्यक त्या बदलांसह शाळांना कळविण्यात येणार आहे. या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शाळा स्तरावरून सर्व संबंधित व इच्छुक उमेदवारांना या स्थगितीबाबत व सद्यस्थितीची आवश्यक माहिती त्वरित देण्याचे निर्देशही शाळांना देण्यात आले आहेत.