अग्निशमन विभागाची पर्यायी दूरध्वनी सेवा
Date : 28 Sep 2026
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागांतर्गत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन मुख्य नियंत्रण कक्ष (सिटी ऑपरेशन सेंटर), मनपा मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील दूरध्वनी क्रमांक १०१ तसेच त्याअंतर्गत कार्यरत दूरध्वनी सेवेमध्ये रविवार (ता.२७) रोजी रात्री १०.४२ वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने दूरध्वनी सेवा अचानक बंद झाली असून, विभागाद्वारे पर्यायी दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Back To Home Page
दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक कार्यवाही सुरू असून, सेवा पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी अग्निशमन व आपत्कालीन सेवेसाठी ७०३०९७२२०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता वरील पर्यायी क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांनी केले आहे. दूरध्वनी क्रमांक १०१ व त्याअंतर्गत असलेले संबंधित दूरध्वनी क्रमांक पूर्ववत झाल्यानंतर त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असल्यास नागरिक अग्निशमन केंद्र व केंद्र अधिकारी यांना संपर्क करू शकतात. अग्निशमन केंद्र व केंद्र अधिकारी यांच्या संपर्क क्रमांकाची यादी खालील प्रमाणे आहे