12 लाख 86 हजार किंमतीच्या प्लास्टिक बॅग जप्त
मनपा व एमपीसीबीची संयुक्तपणे धडक कारवाई
Date : 07 Oct 2026
वर्धमाननगरातील श्री. नंदूजी मानकर यांच्या मालकीच्या बिग बास्केट टाटा इन्टरप्रायझेसवर ही कारवाई मनपाच्या एनडीएसचे प्रमुख श्री. वीरसेन तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रीक सहाय्यक श्री. वैभव राऊत, श्री. प्रफुल वर्मा, पथक प्रमुख श्री. नत्थू खांडेकर, श्री. राजेंद्र मेश्राम, श्री. राणा प्रताप सिंग, श्री. विवेक बोबडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
उपद्रव पथकाची कारवाई
मनपाच्या उपद्रव पथकाने विविध आस्थापनांवर कारवाई करून दंड 70 हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली. यात प्लास्टिक बंदी, विकासकांनी रस्त्यावर टाकलेले बांधकाम साहित्य, मनपाचे चेंबर कचर्याने बंद करण्याची कृती दिसून आल्याने कारवाई केली आहे.
आठ रस्ता चौकातील मेसर्स मंगेश दी ब्लिसने मनपाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मानेवाडा भागातील मे. कटियार इंफ्रावर सुद्धा कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. चिंचभवन भागात रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य पसरविल्याच्या आरोपावरून मे. जे. पी. रेसिडन्सीवर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे झिंगाबाई टाकळी परिसरातील गोल्डन मिडोजने मनपाच्या आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्याच्या विरोधात कारवाई करून 10 हजार रुपयांची वसुली केली आहे. याशिवाय मे. जयदुर्गा, श्री. बादल पांडे, मे. ओम डिस्पोझल अँड सेल्स, मे. वंदना किराणा स्टोअर, मे. गंगाचरण किराणा स्टोअरवर सुद्धा कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे व कचरा पसरविणार्यांच्या शहरात सर््व झोनमध्ये कारवाई करून 41 हजार रुपयांचा दंड वसूल केला.