सामाजिक जाणिव असलेला अभिनेता गमावला
महापौर श्रीमती निता ठाकरे यांची नाना पाटेकर यांच्या निधनावर शोकसंवेदना
Date : 08 Oct 2026
आपल्या दमदार अभियनाने मराठी नाट्यसृष्टी व हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाने एक सामाजिक जाणिव असलेला अभिनेता गमावला आहे, अशा शब्दात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे.
Back To Home Page
मराठी नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाची मोहर उमटविल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी दमदार अभिनयाने गाजविली. हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका वठवून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अभिनेता म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाम नावाची संस्था उभी केली. या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणिवेतून राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, असे श्रीमती ठाकरे यांनी शोक संदेशात म्हटले आहे.