मनपाद्वारे मस्कऱ्या गणपती मूर्ती विसर्जनाची व्यवस्था पोलीस लाईन टाकळी जलकुंडात
गणेशोत्सव मंडळानी मोठ्या संख्येत लाभ घेण्याचे महापौरांचे आवाहन
Date : 09 Oct 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम, श्री. मिलिंद मेश्राम यांच्या उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी देखरेखीत विसर्जन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, शहरातील जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मनपाने उत्तम व्यवस्था केली आहे. यापूर्वी देखील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी शहराच्या काही ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्याचा लाभ सर्वांना झाला, पाणी टंचाई बघता नागरिकांच्या सहकार्याची मनपाला अपेक्षा आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपाद्वारे पोलीस लाईन टाकळी येथील जलकुंडात व्यवस्था करण्यात आले आहे. मंडळानी या व्यवस्थेचा उत्तम लाभ घ्यावा, तसेच जल प्रदूषण मुक्त नागपूरसाठी सहकार्य करावे असे आवाहन सर्व मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळांना केले आहे.