वर्ल्ड बँक प्रकल्पाकडून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा कालावधी वाढवला
शुक्रवार पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार, उपमहापौर लिला हाथीबेड यांनी केली कामाची पाहणी
Date : 09 Oct 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सुद्धा काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी गुरुवारी सायंकाळी याकामाची पाहणी केली. उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी शुक्रवार पासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जलप्रदाय समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांनी सुद्धा काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सध्या सुरू असलेल्या कामामध्ये पाइपलाइन स्थलांतराच्या कामाचा भाग म्हणून मानकापूर नाल्याजवळील 1,400 मिमी व्यासाच्या दोन पाइपलाइन एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे.
मनपाने ग्राहकांना या वाढवलेल्या पाणीपुरवठा बंद कालावधीत सहकार्य करण्याचे आणि पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करीत काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, मनपाद्वारे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल असून,प्रभावित भागातील ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे, असे मनपाने सांगितले आहे.