मनपाच्या भव्य सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद
सेवा संकल्प अन् स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत दिल पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Date : 11 Oct 2026
मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, टायगर सिटी सायकल असोसिएशनचे सायकलपटू श्री. दिलीप वरकड आणि टायगर ग्रुप ऑफ अॅडव्हेंचरचे सायकलपटू श्री. रवींद्र करारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मनपाच्या जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे, क्रीडा विभागाच्या श्रीमती उज्ज्वला चरडे, क्रीडा विभागाचे श्री. शुभम सुपारे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिव्हिल लाईन स्थित मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा पासून सुरू झालेली सायकल रॅली विधान भवन चौक होत,आकाशवाणी चौक प्रधान डाक घर (जी.पी.ओ.) चौक, सी.पी. क्लब, हनुमान मंदिर, तेलंखेडी आणि व्ही.सी.ए. चौक या मार्गाने मार्गक्रमण करून पुन्हा मनपा मुख्यालयासमोरील हिरवळीवर पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये शहरातील नागरिक, विविध सायकल संघटनांचे सदस्य, ज्येष्ठ सायकलपटू आणि बालसायकलपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
आठ वर्षी चिमुकल्यासह ८५ वर्षीय सायकलपटूनी केली जनजागृती
रॅली दरम्यान सर्व वयोगटातील सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी आठ वर्षीय चि. विनय चौधरी सह ज्येष्ठ सायकलपटूं ८५ वर्षीय श्री. श्रीपाद भुरडे यांचा सहभाग. नोंदविला श्री. श्रीपाद भुरडे यांनी "सायकल चालवा! पर्यावरण वाचवा सायकल चालवा, आरोग्य राखा सायकल चालवा! इंधन वाचवा झाडे लावा ! झाडे जगवा...!" असे जनजागृती फलक हाती घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.