संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठीनागपूर महानगरपालिकेने विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित केले
Date : 12 Oct 2026
नागपूर शहराला पाणी पुरवठाकरणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठीनागपूर महानगरपालिकेने विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे किंवा बगिचासाठीवापर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंड ठोठावण्याचे प्रस्तावित आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी नागपूर शहराच्या संभाव्या पाणी टंचाईच्यासंदर्भात जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलसाठ्याच्यासद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापौर यांनी नागरिकांना संभाव्यपाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा गैरवापर टाळावा, पाणी जपून वापरावेअसे आवाहन केले.
Back To Home Page
यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायीसमितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समितीच्यासभापती श्रीमती दिव्या धुरडे, आरोग्य समितीच्या सभापती श्रीमतीमनीषा अतकरे, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे,अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम.,अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम,अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचेअधिकारी उपस्थित होते.