अंबाझरी परिसरासह इतर ठिकाणी मनपाद्वारे अनुयायांसाठी स्नानगृहांची व्यवस्था
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात मनपाच्या विविध नागरी सुविधा
Date : 19 Oct 2026
अंबाझरी तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या स्नानगृहांची मोठ्या संख्येने अनुयायांकडून लाभ घेतला जात असून, मनपाच्या वतीने करण्यात आलेल्या नागरी व्यवस्थेबद्दल अनुयायांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अनुयायांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरणाचे संरक्षण आणि तलावाची स्वच्छता अबाधित ठेवण्यावरही मनपाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अंबाझरी तलाव परिसरातील स्नानगृहांची व्यवस्था महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्रपणे करण्यात आली असून, अनुयायांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधाजनक वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठ्या संख्येने नागपूर शहरात येणाऱ्या अनुयायांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपाचे अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. यासोबत अनुयायांना येणाऱ्या अडचणी आणि समस्येच्या समाधानासाठी मनपाच्या वतीने २४ तास उपलब्ध असे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने नागरिकांच्या समस्या सोडवता येत आहे. नागरिक व अनुयायांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा वापर करून परिसराची स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरूवार २२ ऑक्टोबर सायंकाळ पर्यंत मुलभुत व अत्यावश्यक सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. दीक्षाभूमी परिसराच्या ठिकाणी व सभोवताल (दीक्षाभूमी ते लॉ कॉलेज परिसर, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापिठ परिसर, आय.टी.आय. परिसर, माता कचेरी परिसर, जेल परिसर) येथे एकूण १०५५ शौचालयाच्या सिटस् तसेच अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी १८० शौचालयाच्या सिटस् व बेझनबाग व उंटखाना मैदानात ४० शौचालयाच्या सिटस् अशा एकूण १२८५ शौचालयाच्या सिटस् उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यात महिला व पुरूषांकीरता वेगवेगळे १४० स्नानगृहाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हाथ, चेहरा व पाय धुण्याकरीता ५० वॉश बेसिंन ची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्थेकरीता रस्त्यावर १२० नळांची व्यवस्था तसेच प्रत्येक निवारा केंद्रावर पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे.अतिरिक्त प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नागपूर महानगरपालिकेद्वारे ४४ स्थायी सीसीटीव्ही कॅमेरे व १६ अस्थायी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून सुरक्षा व्यवस्थेकरीता पोलिस विभागास मदत करण्यात येत आहे. परिवहन व्यवस्थेकरीता काचीपुरा चौकात म.न.पा. परिवहन विभागाचे नियंत्रण कक्ष तयार करून उक्त नियंत्रण कक्षातून अनुयायांकरीता प्रवासाकरीता १६० आपली बसेसच्या ई बसेसची व्यवस्था केलेली आहे. स्वास्थ व्यवस्थेकरीता मनपाद वारे दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या चौकामध्ये आरोग्य सहाय्यता केंद्र, रुग्णवाहिका तैनात केलेले आहे. आपत्ती व्यवस्थापने अंतर्गत अग्निशमन विभागाचे अग्निशमन दल तैनात करण्यात आलेले आहे.
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
1) दीक्षाभूमी अग्निशमन व आपत्कालीन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक-0712-2220030
2) नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्ष अण्णाभाऊ साठे चौक - 0712-2220029