मनपाच्या श्री दुर्गा देवी मूर्ती विसर्जन व्यवस्थेचा मंडळांनी घेतला लाभ
मनपाच्या कृत्रिम जलकुंडांत ६ हजार ३६२ घट अन् १४० श्री दुर्गा देवी मूर्तींचे विसर्जन
Date : 21 Oct 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात घट विसर्जन व मूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कृत्रिम तलावांमध्ये क्रेनची व्यवस्था करून विसर्जनासाठी मदत केली.
झोननिहाय विसर्जन:
लक्ष्मीनगर झोनमध्ये १ कृत्रिम तलाव उभारण्यात आला असून, येथे ७४० नवरात्री घट आणि २४ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत १ हजार ८३५ घटांचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये १ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून, येथे १ हजार ४५७ घट व ९ मूर्तींचे विसर्जन झाले. नेहरूनगर झोनमध्ये १ कृत्रिम तलावाची व्यवस्था असून, येथे ३५१ घट व २४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गांधीबाग झोन येथे ८७४ घटांचे विसर्जन करण्यात आले. सतरंजीपुरा झोन येथे २८० घटांचे विसर्जन करण्यात आले. लकडगंज झोन येथे ७२५ घटांचे विसर्जन तसेच मंगळवारी झोन अंतर्गत १०० घटांचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय पोलीस लाईन टाकळी येथील कृत्रिम जलकुंडात १०, गोरेवाडा रिंग रोड जलकुंडात ४२ आणि कोराडी जलकुंडात ३१ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.