मनपातर्फे महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली
Date : 26 Oct 2026
रामायणाचे रचियता महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील महापौर कक्षासमोरील तैलचित्राला उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी आज (ता. 26) पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
Back To Home Page
यावेळी उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. प्रमोद बराई यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी अ. भा. वाल्मिकी महासभाचे सर्वश्री मोतीलालजी जनवारे, उमेश पिंपरे, राजेंद्र हजारे, बंटी पैसाडली, राजकुमार खरे, रमेश मोगरे, शंभूलाल समुंद्रे, विशाल मधुमटके, संदीप नाहरकर, निलेश सागर, बबलू मेहरोलिया व अनिल कटारे यांनीही उपस्थित राहून आदरांजली वाहिली.