नागपूर शहरातील एकल महिलांनी ऑनलाईन सर्वेक्षण व नोंदणी करावी
महापौर अन् आयुक्त यांचे आवाहन
Date : 26 Oct 2026
नागपूर महानगरपालिकेमार्फत नागपूर शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता यावी, यासाठी नागपूर महानगरपालिके मार्फत ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकल महिला सर्वेक्षण नोंदणी Link - http://admin-dept-portal.emergent.host या संकेतस्थळावर करता येईल. नागपूर शहरातील सर्व एकल महिलांनी सदर ऑनलाईन लिंकवर जाऊन आपली माहिती भरून नोंदणी करून घ्यावी. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शासकीय योजनांशी संबंधित सक्षमीकरणासाठी ही नोंदणी महत्त्वपूर्ण असून, एकल महिलांनी या उपक्रमास सहकार्य करून आपली नोंदणी पूर्ण करावी. नागपूर शहरातील सर्व एकल महिलांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आहे.