मनपाच्या कृत्रिम तलावांत एकूण ९७८ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन
Date : 27 Oct 2026
शहरातील विविध कृत्रिम तलाव व जलकुंडांमध्ये भक्तांनी श्री दुर्गा देवींच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. पाच दिवसात एकूण ९७८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापौर श्रीमती निता ठाकरे व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात घट विसर्जन व मूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कृत्रिम तलावांमध्ये क्रेनची व्यवस्था करून विसर्जनासाठी मदत केली.
एकूण विसर्जन
पाच दिवसात लक्ष्मीनगर झोन येथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंडात एकूण ८९ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोन येथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंडात एकूण ३२ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नेहरूनगर झोन येथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम जलकुंडात एकूण ३७ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय गोरेवाडा रिंग रोड येथे मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात पाच दिवसात एकूण ३५९ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पोलिस लाईन टाकळी येथे मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात पाच दिवसात एकूण १५४ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, तसेच कोराडी येथे मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात पाच दिवसात एकूण ३०७ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे शहरात एकूण ९७८ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.