मनपाच्या एनडीएस पथकाकडून 136 किलो प्लास्टिक जप्त
प्लास्टिकचा बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्यांवर 90 हजार रुपयांचा दंड
Date : 27 Oct 2026
राज्य सरकारने निर्बंध टाकलेल्या सिंगल यूझ प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर मनपाच्या एनडीएस पथकाने छापे मारले. मंगळवारी व धरमपेठ झोनमध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठानांवर छापे मारून 136 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये रामनगरातील मे बाबा सेल्स दुकानातून निर्बंध घातलेले 35 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मंगळवारी झोनमधील जरीपटका भागातील मे. करण ट्रेडर्सवर छापा मारून 72 किलो सिंगल यूझ प्लास्टिक जप्त करण्यात आले व 5 हजार रुपयांचे दंड आकारण्यात आला. याच झोनमधील जरीपटका भागातील कार्तिक ट्रेडर्सवर छापारा मारून 29 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. या व्यापाऱ्यांवर सुद्धा 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
त्याचप्रमाणे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या, पार्किंगसाठी अडथळा आणणाऱ्या, हॉटेलमधील कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. जम्बूदीपनगरातील मे व्यंकटेश डेव्हलपर्संवर बांधकाम साहित्य रस्त्याच्या बाजूला जमा करून मनपाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उंटखाना चौकातील मे. सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलने बांधकाम साहित्य रस्त्याच्या बाजूला ठेवल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड ठोकला. भंडारा मार्गावरील हरीहर मंदिराजवळ मे. हॉटेल रेडिसन च्या बाजूला बांधकाम साहित्य जमा केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय मे. करण ट्रेडर्स, कार्तिक ट्रेडर्स, हिरणवार किराणा स्टोअर, बंसी किराणा स्टोअर, दत्तात्रयनगरातील जनाब शेरूभाई पठाण, जॅक अंड जील रेस्टॉरंट, हिंदुस्थान कॉलनी चौकातील आयसीआयसीआय बँक, मे. स्वास्थ्यम हॉस्पिटल, मे. भारत बिल्डरवर सुद्धा मनपाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
त्याचप्रमाणे रस्तावर कचरा फेकणाऱ्या पार्किंगसाठी अडथळा आणणाऱ्या, हॉटेल मधील कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला जम्बुदीपनगरातील मे व्यंकटेश डेव्हलपर्संवर बांधकाम साहित्य रस्याच्या बाजूला जमा करून मनपाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दुंड ठोठावण्यात आला. उंटखाना चौकातील मे. सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलने बांधकाम साहित्य रस्त्याच्या बाजूला ठेवल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड ठोकला. भंडारा मार्गावरील हरीहर मंदिराजवळील मे. हॉटेल रेडिसन च्या बाजूला बांधकाम साहित्य जमा केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय मे करण ट्रेडर्स, कार्तिक ट्रेडर्स, हिरणवार किराणा स्टोअर, बंसी किराणा स्टोअर, दत्तात्रय नगरातील जनाब शेरूभाई पठाण, जॅक अंड जील रेस्ट्रॉरंट, हिंदुस्थान कॉलनी चौकातील आयसीआयसीआय बँक, मे. स्वास्थ्यम हॉस्पिटल, मे. भारत बिल्डर्सवर सुद्धा मनपाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कार वॉशिंगसाठी पिण्याचे पाणी करण्याचे 20 ठिकाणे उघड
कार व इतर वाहने धण्यासाठी मनपाच्या पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे शहरात 20 ठिकाणे उघडकीस आले आहे. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मनपाने पाणी बचतीरसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात वाहने धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये, असे निर्देश मनपातर्फे देण्यात आले आहेत. मनपाच्या एनडीएस पथकाने शहरातील 10 झोनमध्ये कार वॉशिंग करणाऱ्या गॅरेजची पाहणी केली यात शहरात 20 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. यात सतरंजीपुरा झोनमधील 8, धरमपेठ झोन मधील 5, नेहरूनगर झोनमधील 4, धंतोली झोन, लकडगंज झोन व मंगळवारी झोनमधील प्रत्येकी एका ठिकाणी कार वॉशिंगसाठी पिण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.