नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
वाल्मिकी हिंदी माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप; जंतसंसर्ग प्रतिबंधाबाबत जनजागृती
Date : 27 Oct 2026
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या अनुषंगाने १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये कुपोषण व रक्तक्षय होण्याचा धोका असतो. तसेच यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर, मानसिक विकासावर आणि शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी जंतसंसर्ग प्रतिबंधाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा बालकांचे आरोग्य, पोषणस्थिती आणि सर्वांगीण विकास सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.तसेच UPHC द्वारे शाळेला गोळ्यां पुरविण्यात आल्या. शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या निःशुल्क दिल्या जातात. नोंदणी न झालेल्या तसेच शाळेबाहेरील मुला-मुलींनाही अंगणवाडी स्तरावर गोळ्या देण्याची व्यवस्था करण्यात येते.
हा उपक्रम महापौर श्रीमती. निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयुक्त डॉ. विपीन,मा. अतिरिक्त आयुक्त श्री अंकित, श्री. मुरुगानंथम एम. यांच्या देखरेखीत आयोजित करण्यात आला.
यावेळी मुंबईचे उपसंचालक डॉ. सचिन तडस यांनी विद्यार्थ्यांना जंतसंसर्ग प्रतिबंधाचे महत्त्व सांगितले. नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनीअल्बेंडाझोल (Albendazole) या जंतनाशक गोळीचे महत्त्व आणि बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यातील तिची भूमिका याबाबत माहिती दिली तसेच जंतसंसर्गामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर, मानसिक विकासावर आणि शैक्षणिक प्रगतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत मार्गदर्शन केले.
ज्या मुला-मुलींना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जंतनाशक गोळी मिळाली नसेल, त्यांच्यासाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी संबंधित मुलांना जंतनाशक गोळी देण्याबाबत पालकांनी जागरूक राहावे असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा.उपसंचालक डॉ. सचिन तडस, नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार,शिक्षणाधिकारी श्री.अमित भदाणे,जिल्हा परिषद नागपूरचे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपाचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, जिल्हा परिषद चे मा.जिल्हा माता व बाळ सांगोपण अधिकारी डॉ. रेवती साबळे, वाल्मिकी हिंदी माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका डॉ. वंदना महाजन, जिल्हा ग्रामीण रुग्णालयचे डॉ. वानखेडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विभूती पानबुडे, पी.एच.एन श्रीमती अर्चना खाडे, श्रीमती. ज्योती मानकर,श्री. प्रफुल्ल किन्हीकर, संवाद तज्ज्ञ श्री. स्नेहल करंजेकर तसेच वाल्मिकी हिंदी माध्यमिक शाळेचे शिक्षिका, तेलंगखेडी दवाखाना परिचारिका व आशा तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.