२१ कि.मी महिलागटात आंतरराष्ट्रीयधावपटू तसेहाय ओहावा, तर पुरूष गटात नागपूरचा राजन यादव अव्वल मनपाच्या 'युनिटी मॅरेथॉन स्पर्धेला' उदंड प्रतिसाद
दहा हजाराहून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सक्रीय सहभाग सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदानात रंगला राष्ट्रीय एकतेचा सोहळा
Date : 31 Oct 2026
मॅरेथॉन स्पर्धेला पहाटे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार श्री कृष्णा खोपडे, महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते तथा युनिटी मॅरेथॉनचे संयोजक श्री. नरेंद्र (बाल्या)बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, कर आकारणी समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, झोन समिती सभापती श्रीमती ज्योती देवघरे, श्रीमती महेश्वरी बिसेन, श्रीमती उमा देशमुख, श्रीमती सीमा ढोमणे, श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, श्रीमती अर्चना पडोळे, श्रीमती पूजा पाठक, श्रीमती शारदा बारई, श्रीमती शीतल रारोकर, नगरसेवक श्री विजय होले, नगरसेवक श्री. विनय दाणी, श्री.विनोद कन्हेरे, एआयएमआयएमचे गट नेते श्री शकील पटेल, श्री.विजय (पिंटू )झलके श्री. श्रीकांत आगलावे, श्री.मनोज साबळे, श्री.बालू रारोकर,श्री. अतुल कोटेचा श्री. राजेश्वर दिवटे यांच्यासह उपजिल्हाधिकारी श्री सुरेश बगळे, मनपाचे उपायुक्त श्री मंगेश खवले, श्री. राजेश भगत, सहाय्यक आयुक्त डॉ. सौरभ कावळे, श्री. राजेश मसराम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, कार्यकारी श्री. सुनील गजभिये, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल : डॉ. पंकज भोयर
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर महानगरपालिकाद्वारा देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युनिटी मॅरेथॉनच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मागील काहीवर्षात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी अधिकची आर्थिक तरतुदी केल्यामुळे आधुनिक क्रीडा साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. आजची तरुण पिढी क्रीडा क्षेत्राशी जोडली जात असल्याने नशामुक्त भारताच्या संकल्पनेला सकारात्मक दिशा मिळत आहे. वर्ध्यात कबड्डी असो किंवा नागपुरातील कुस्ती, विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भव्य आयोजनासाठी अभिनंदन करीत, युनिटी मॅरेथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी उपस्थित मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांचे स्वागत करीत सांगितले की, मागील वर्षी ग्रेट नाग रोडवरील सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळून या मॅरेथॉनचा प्रारंभ करण्यात आला होता, यंदा याच स्पर्धेसाठी एकूण ११ लाख रुपयांची आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली असून, प्रत्येक गटासाठी अंतरानुसार तसेच पुरुष व महिला असे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आले आहे. याशिवाय फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठीही विविध पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकत्रित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची आठवण जपत राष्ट्रीय एकात्मतेची भावना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून, नागपूरकर नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत कौतुक केले. विशेष म्हणजे, महापौर यांच्या प्रभागातील धावपटू यांनी विविध गटात पुरस्कार प्राप्त केले.
यावेळी आमदार श्री. कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, एकेकाळी पडीक असलेल्या कच्छीविसा मैदानाचा विकास करून येथे वर्षभर विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल मैदानाचा मैदानाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी महापौरांचे अभिनंदन करीत, नागपूर शहरातील मॅरेथॉनसारखा महत्त्वपूर्ण उपक्रम या मैदानावर आयोजित होत असल्याचा आनंद व्यक्त केला